राजकारण मीडिया: जयसिंगपूर: दिनांक :१६/०३/२०२६: प्रभाकर करचे:शिरोळ तालुक्यातील लोणारी समाजातील ज्येष्ठ नेते मा. श्री. शिवाजी उर्फ पोपट तानाजी गेंड यांच्या ५० व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामुळे जयसिंगपूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकार्य, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यामुळे गेंड यांचे नाव लोणारी समाजात आदराने घेतले जाते.
या विशेष सोहळ्याचे आयोजन शिरोळ तालुका लोणारी समाज संचालक मंडळ, तुळजाभवानी कन्स्ट्रक्शन, जयसिंगपूर तसेच राजीव गांधी नगर परिसरातील मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रम सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राजीव गांधी नगर, गल्लीनं. ९, शानदार चौक, जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात गेंड यांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्याचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष सत्कार सोहळा होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध उपक्रम, सामाजिक ऐक्य आणि विकासकामांसाठी योगदान देणाऱ्या गेंड यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे स्वागत करण्यासाठी समाजातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
