वीर धरणातून आज सायंकाळपासून ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू! नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

राजकारण मीडिया:फलटण: दि. ०८/०७/२०२६ : प्रभाकर करचे: सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून वीर धरण ८७.२७टक्के भरले असून ,आज (बुधवार, ८ जुलै) सायंकाळी ६ वाजल्यापासून नीरा नदीपात्रात एकूण ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे.

नीरा उजवा कालवा विभाग, फलटणचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर धरणाच्या सांडव्यावरून ४,६३७ क्युसेक आणि एस्केपमधून १,४०० क्युसेक असा मिळून ६,०३७ क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

दरम्यान, धरण परिसरात पडणारा पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गामध्ये पुढील काळात वाढ अथवा घट होऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच तसेच निरा उजवा व डाव्या कालव्यातून १५०० क्युसिक ने विसर्ग सुरू आहे.

संभाव्य धोक्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणीही नदीपात्रात जाऊ नये, तसेच नदीकाठावरील जनावरे, शेतीची अवजारे, पंप, पाइप व इतर साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सखल भागातील नागरिकांना वेळेत सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!