शिंदेवाडीतील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ गुलाबराव जाधव यांचे निधन; परिसरात हळहळ

राजकारण मीडिया:फलटण : दि. 28 /07/2026:प्रभाकर करचे:शिंदेवाडी (ता. फलटण) येथील ज्येष्ठ नागरिक कै. हरिभाऊ गुलाबराव जाधव (वय 85) यांचे सोमवार, दि. 27 जुलै 2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदेवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै. हरिभाऊ जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ते फलटण वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन जाधव तसेच माजी अध्यक्ष अॅड. प्रवीण जाधव यांचे सख्खे चुलते होत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कै. हरिभाऊ जाधव यांच्या पार्थिवावर शिंदेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या साध्या, प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने जाधव कुटुंबासह शिंदेवाडी गावाने एक ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!