
कामगार संघटना चालकच झाले बांधकाम कामगारांचे मालक
बांधकाम कामगारांना पैसे विना मिळेना सरकारी सवलती
फलटण – फलटण तालुक्यातील कित्येक संघटनेच्या माध्यमातून गरीब कामगारांना वेगवेगळ्या थापा सांगुन त्यांना त्यांच्या अधिकारापासून डावलले जात असल्याचे बोलले जात आहे.महिला वर्ग तसेच बांधकाम कामगारांना या योजना कुठून येतात व कशा येतात किंवा कोणाकडून मिळतात किती रुपयात मिळतात हे कामगार वर्गाला माहित नसते आणि कामगार वर्गाला माहीत नसल्याचा फायदा घेत हे सर्व मंडळी बरोबर सांगण्यापेक्षा त्या कामगारांना त्यांच्या हक्काचं फायदा फ्री स्वरूपात किंव्हा शासनाच्या नियमाप्रमे न देता आर्थिक लूट जादा करत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.
संघटनेच्या माध्यमातून कामगारांना भुल थापा देऊन सांगितले जात आहे की तुम्हाला तुमच्या योजना संघटनेच्या माध्यमातून भांडी शिष्यवृत्ती मिळणार किंव्हा या अजून ही आश्वासने देऊन त्यांना संघटनेच्या माध्यमातून आमिष दाखवून चुकीचे सांगून या कामगारांना त्यांचा खरा मोबदला किंव्हा माहिती पासून वंचित ठेवले जात आहे. शासन हे कामगार वर्गासाठी विविध योजना राबवत आहे. परंतु हे एजंट आजच्या काळात स्वतःचे खिसे भरून कामगारांची फसवून करत आहेत. फलटण तालुक्यातील कामगार संघटना चालक नसून कामगारांचं मालक बनले आहेत या मध्ये हे कामगार संघटना चालवतात हे लोक गरीब कामगार वर्गाकडून आगोदरच भरपूर पैसे घेऊन यांनी स्वतःचे खिसे भरले आहे. की काय या सर्व संघटना यांची चौकशी होणे गरजेचे. एखाद्या कामगारावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा या संघटना कुठे असतात? कामगार संघटना म्हणजे कामगारांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी असतात.
परंतु येथील संघटना या कामगार वर्गाला लुटत असल्याचे दिसत आहे. या कामगार वर्गाचे फॉर्म हे खाजगी संघटना चालविणारे स्वतःला ठेकेदार असल्या प्रमाणे तर काहींनी खिशातच ठेकेदार ठेवल्यासारखे शिक्के मारल्याचे प्रकार होऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे कामगार यांचा फॉर्म हा ठेकेदार यांच्याकडून भरायला पाहिजेत ज्या ठेकेदार वर्गाकडे काम करत असणारा कामगार यांना शिक्का प्राधान्याने मिळाला पाहिजे परंतु या संघटना आगोदरच फॉर्म भरून घेऊन अधिकारी वर्गाशी मिळते जुळते संबंध ठेऊन कामगार वर्गाची लूट झालेली पाहायला मिळत आहे.
कामगार आयुक्त यांनी फलटण तालुक्यातील सर्व कामगार संघटना जे चालवतात याची पूर्ण चौकशी करावी आपल्याकडे किती कामगार वर्गाचे फॉर्म त्यांच्याकडून किती पैसे घेतात किती पैसे भरावे लागतात कोण कोणत्या फलटण तालुक्यात कामगार संघटना बांधकाम कामगाराचे काम करतात त्यांचे हेतू काय असतात हे पाहणे गरजेचे आहे.अशा लुटारू संघटने पासून कामगार वर्गाचा बचाव करावा आणि सरकारी ठेकेदार यांना जसे बांधकाम कामगार यांच्या फॉर्मवर शिक्का देण्याचा अधिकार दिला तसेच पूर्ण अधिकार हे सरकारी ठेकेदार यांना द्यावा म्हणजे अनधिकृत कामगार सुध्दा कळतील आणि सुरू असणारी कामगारांची लूट थांबेल नवीन झालेले बांधकाम कामगार नोंदणी कार्यालय फलटण मध्ये तरी कामगारांची आर्थिक लूट थांबवावी असे बोलले जात आहे.
