**सोमंथळी येथे कीर्तन, फुले वाहण्याचा कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन; ह.भ.प. पांडुरंग महाराज सोडमिसे यांचे कीर्तन**
राजकारण मीडिया:फलटण :दिनांक: 10/11/2026:प्रभाकर करचे: जीवनाच्या प्रवासात काही माणसे काळाच्या पडद्याआड जातात; मात्र त्यांच्या आठवणी, संस्कार आणि मायेचा सुगंध सदैव दरवळत राहतो. अशाच प्रेमळ स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्व. यशोदा लक्ष्मण सोडमिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिक शुद्ध ४, शुक्रवार या शुभदिनी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. पांडुरंग महाराज सोडमिसे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी स्व. यशोदाबाई यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत उपस्थितांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा धार्मिक व स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम राधिका गार्डन, मंगल कार्यालय, सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा येथे संपन्न होणार आहे.
**आठवणींच्या सुगंधातून भावपूर्ण अभिवादन!**
‘कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला; आठवण येते क्षणाक्षणाला, आजही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला…’ या हृदयस्पर्शी शब्दांतून स्व. यशोदाबाई यांच्या आठवणींना कुटुंबीयांनी भावपूर्ण उजाळा दिला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक मा. श्री. दत्तात्रय लक्ष्मण सोडमिसे व समस्त सोडमिसे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, आप्तेष्ट व हितचिंतकांनी उपस्थित राहून स्व. यशोदाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन सोडमिसे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
