शेतकऱ्यांच्या हस्ते वही-काटा पूजन; व्यापाराला बळ देत परंपरेला अनोखी मानवंदना!

राजकारण मीडिया :फलटण: दिनांक:10/11/2026:प्रभाकर करचे: व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान व्हावा आणि व्यापाराची सुरुवात शेतकऱ्यांच्या शुभहस्ते व्हावी, या अनोख्या संकल्पनेतून **सस्ते व्हेजिटेबल फ्रुट कमिशन एजंट, श्रीमंत शिवाजी राजे भाजीपाला व फळे मार्केट, गाळा क्रमांक ४, मार्केट यार्ड, फलटणचे प्रोप्रायटर संतोष उर्फ बापू सस्ते,गणेश सस्ते, अक्षय सस्ते यांच्या पुढाकारातून वही व काटा पूजनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी व्यापाराच्या केंद्रस्थानी असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच हस्ते वही आणि काट्याचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकणारा भाजीपाला व फळे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या संपूर्ण व्यापार प्रक्रियेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून, त्याच्याच हस्ते नवीन व्यापारवर्षाची सुरुवात करण्याचा हा उपक्रम निश्चितच वेगळा आणि प्रेरणादायी ठरला.

व्यापारामध्ये विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिक व्यवहार आणि शेतकऱ्यांचा सन्मान या मूल्यांना प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. केवळ वही आणि काट्याचे पूजन न करता शेतकऱ्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्याचा आणि व्यापारी-शेतकरी नात्यात आपुलकीचा सेतू निर्माण करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हातून पूजन करून व्यापाराची मुहूर्तमेढ रोवण्याची ही संकल्पना फलटणच्या कृषी व्यापार क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरत असून, **शेतकरी हाच व्यापाराचा खरा आधारस्तंभ आहे**, हा संदेश या अनोख्या उपक्रमातून अधोरेखित झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!