फलटण मध्ये MILTON सोलर कंपनीचा प्रशिक्षण व रोजगार मेळावा; युवक-युवतींना रोजगाराची नवी संधी

राजकारण मीडिया:फलटण: दि.०४/०७/२०२६: प्रभाकर करचे: रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या पुढाकारातून MILTON Solar Limited कंपनीच्या सहकार्याने आयोजित प्रशिक्षण व रोजगार मेळावा गुरुवारी हॉटेल महाराजा एक्झिक्यूटिव्ह येथे उत्साहात पार पडला. सातारा जिल्ह्यातील महिला व पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदविला.

मेळाव्यात MILTON कंपनीचे विशेष प्रशिक्षक श्री. कुणाल पाटील यांनी सौरऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी, कंपनीचे कार्य, प्रशिक्षणाची प्रक्रिया आणि रोजगाराच्या विविध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सोप्या व समर्पक भाषेत उत्तरे देत सर्वांच्या शंकांचे निरसन केले.

संस्थेच्या संस्थापक सौ. रझिया शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी MILTON कंपनीचे पार्टनर श्री. मुबारक शेख यांचा रणरागिणी संस्थेचे संचालक श्री. अप्पासाहेब कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई येथे होणारे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सोयीसाठी फलटणमध्ये आयोजित करण्याचे आवाहन संस्थेने केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. मुबारक शेख यांनी प्रशिक्षण फलटणमध्ये आयोजित करून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी MILTON कंपनीचे श्री. दत्ता कोकरे (मार्केटिंग पार्टनर) यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास MILTON कंपनीचे श्री. कुणाल पाटील, श्री. मुबारक शेख, श्री. दत्ता कोकरे, श्री. संजय उबाळे, श्री. शैलेश म्हात्रे, श्री. विजय कांबळे, श्री. किरण घुगरे तसेच महिला कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संस्थापक सौ. रझिया शेख, संचालक श्री. अप्पासाहेब कापसे, माजी प्राचार्य शाहीन शेख, सचिव श्री. मारुती टकले, खजिनदार श्री. कैफ शेख, श्री. महेंद्र सपकाळ, श्री. सतीश देसाई, मानवाधिकार फाउंडेशन भारतचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रणधीर भोसले, प्रगती चळवळीचे पत्रकार श्री. प्रदीप सस्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक सौ. रझिया शेख यांनी उपस्थित मान्यवर, MILTON कंपनीचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला-पुरुषांचे आभार मानले. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींना प्रशिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!