राजकारण मीडिया:सोमंथळी : दिनांक:२५/०५/२०२६: प्रभाकर करचे : सोमंथळी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. कोंडीराम बाबा सोडमिसे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी सौ. बाळूबाई विश्वास गोफणे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोसायटीच्या कामकाजाला नवे नेतृत्व लाभले असून सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झाल्याचे सांगण्यात आले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थ, सभासद व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना नव्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांचा विश्वास कायम ठेवत पारदर्शक व विकासाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सोमंथळी विकास सोसायटीच्या नव्या नेतृत्वाकडून सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या असून आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
सोमंथळी विकास सोसायटीच्या पदाधिकारी निवडी वेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, भिवा पोकळे, हनुमंत सोडमिसे सुभाष बोडरे, सतीश यादव, अशोक भापकर, संजय गोफणे व इतर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.💐
