फलटण पंचायत समिती सभापतीची निवड १६ मार्चला! जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड २० मार्चला!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक :०७/०३/२०२६: प्रभाकर करचे :जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृह, सातारा येथे पार पडणार आहे. ही निवडणूक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापती पदाची निवडणूक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी पिठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

यासंदर्भातील अधिकृत नोटीस ६ मार्च २०२६ रोजी काढण्यात आली असून, ती बजावणीसाठी संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!