राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०८/०३/२०२६: प्रभाकर करचे:आज रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड ICC T20 विश्वचषक अंतिम सामन्याचे फलटणमध्ये मोठ्या पडद्यावर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमींना अंतिम सामन्याचा थरार एकत्रित अनुभवता यावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ही लाईव्ह स्क्रीनिंग व्यवस्था गोविंद मिल्क, फलटण आणि राजे ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, शहरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठ्या एलईडी स्क्रीनवर सामना दाखवण्यात येणार आहे.
कार्यक्रम सायंकाळी ६.०० वाजता सुरू होणार असून,याचे स्थळ – मुधोजी क्लब, फलटण असे आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले असून, भारतीय संघ विजय मिळवेल अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फलटणमधील क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
