विधी सेवा योजनांचा जनजागृती कार्यक्रम संपन्न…

फलटण:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती फलटण व वकील संघ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा योजनांचा जनजागृती कार्यक्रम पंचायत समिती फलटण यांच्या सभागृह मध्ये दि.२६/०६/२०२५ रोजी पार पडला.

यावेळी हा कार्यक्रम मा. राजेंद्र सं.पाटील भोसले अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती ,तथा जिल्हा न्यायाधीश -१ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

तसेच विधी सेवा योजनांच्या जनजागृती कार्यक्रम निमित्त विधीज्ञ कोमल आर.जाधव यांनी world Bicycle Day, विधीज्ञ एम. सस्ते यांनी World Environment Day, विधीज्ञ राजश्री डी. मोरे यांनी World Day Against Child Labour व विधीज्ञ कुमारी ऋतुपर्णा एस. देशपांडे यांनी lnternational Day Against Drug and lllicit Trafficking या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमास न्यायीक अधिकारी मा. जे. एस. खेडकर- गोयल,मा जे एन जाधव मा. पी एस मुळे, मा. व्ही एस वाघ, मा. ए एस साटोटे, फलटण वकील संघाचे अध्यक्ष मा.नितीन जाधव, वकील संघाचे सचिव कार्यकारणी सदस्य व इतर विधीज्ञ कर्मचारी विधी स्वयंसेवक आणि योध्दा अकॅडमी चे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

यावेळी विधीज्ञ निकीता रसाळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना केली व विधीज्ञ सागर देशपांडे यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!