राजकारण मीडिया:फलटण : दिनांक:०८/०७/२०२६: प्रभाकर करचे: फलटण तालुक्यातील राजुरी येथे विजेचा शॉक लागून ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, येथे अकस्मात मृत्यू क्रमांक ७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश बापुराव निकम (वय ३४, रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) यांना ८ जुलै रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा शॉक लागला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच सकाळी ९.०० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी अमोल भानुदास निकम (वय ३८, रा. राजुरी भवननगर, ता. फलटण) यांनी दिलेल्या माहितीवरून येथे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार चांगण करीत असून, विजेचा शॉक नेमका कशामुळे लागला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेने राजुरी गावावर शोककळा पसरली असून, निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
