माजी खासदार रणजित दादा व आ.सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरणार जनता दरबार

फलटण:माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी फलटण तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येणार या जनता दरबारात फलटण तालुक्यातील शासकीय विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल ज्यामुळे नागरिकांच्या समस्येचे त्वरित निवारण होण्यास मदत होईल.

६ जानेवारी २०२५ रोजी फलटण तालुक्यातील सर्व नागरिक व बंधू भगिनी यांनी आपले सामाजिक व वैयक्तिक कामाचे लेखी अर्ज दोन प्रति मध्ये आमदार सचिन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय महाराजा मंगल कार्यालय शेजारी लक्ष्मी नगर फलटण या ठिकाणी जाऊन जमा करावेत. या अर्जावरच फक्त १०जानेवारीच्या जनता दरबारात सुनावणी तथा निवडा होईल.असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!