अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

राजकारण मीडिया:फलटण:दि. ०२/०६/२०२६ : प्रभाकर करचे: पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचे आवाहन केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (तिरकवाडी) तसेच कुरेशी मोहल्ला उर्दू स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

इयत्ता दहावीमधील कु. सानिका रमेश सोनवलकर, कु. वैष्णवी राहुल शिंदे, चि. साहिल नंदकुमार जाधव, कु. श्रेया नितीन कदम व चि. गौरव सुनील धालवडे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच इयत्ता बारावीमधील कु. सृष्टी चंद्रकांत लोणकर, कु. सुप्रिया संतोष आंधळे, कु. अंकिता सुरेश मसुगडे, कु. श्रेया हिम्मत फरांदे आणि कु. संस्कृती विजय फरांदे यांचाही गौरव करण्यात आला.

विशेष बाब म्हणजे उर्दू स्कूलमधील कु. इरम अक्रम बेपारी (इयत्ता 10 वी) व कु. जोया मोसिन कुरेशी (इयत्ता 12 वी) यांचा त्यांच्या शाळेत जाऊन स्वतंत्रपणे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले तसेच माजी प्राचार्या सौ. शाहीन शेख उपस्थित होत्या.

कार्यक्रमामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा संस्थेचा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!