राजकारण मीडिया: फलटण: दिनांक पाच

पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा आणि सायकल वारीची उत्साहात सांगता

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक ५ डिसेंबर २०२५ : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी पंढरपूर (महाराष्ट्र) ते घुमाण (पंजाब) ही देशातील पहिली आणि सर्वात लांब पल्ल्याची अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारी यंदा अत्यंत उत्साहात पूर्ण झाली. तब्बल ५ हजार किलोमीटर अंतराचा आणि ३१ दिवसांचा हा भव्य आध्यात्मिक प्रवास बुधवारी सांगता सोहळ्याने अविस्मरणीय ठरला.भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा आणि शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव यांची ५५६ वी जयंती (प्रकाश पर्व) यानिमित्त २ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचे वर्ष वारीचे चौथे वर्ष होते.संपूर्ण यात्रेदरम्यान वारीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश अशा आठ राज्यांतून प्रवास पूर्ण केला. या वारीत १०० सायकलस्वार आणि ५० भजनी कलाकार सहभागी झाले होते. देशातील पहिल्या अध्यात्मिक सायकल वारीचे नेतृत्व भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले.सायकल वारीचा समारोप – घुमाण येथेमहाराष्ट्र ते पंजाब असा प्रवास करत आलेल्या सायकल वारीची सांगता २५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) येथे मोठ्या उत्साहात झाली.रथयात्रेची सांगता – पंढरपूर येथेरथयात्रेचा समारोप संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी — नामदेववाडा, पंढरपूर येथे झाला.संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज माऊली महाराज नामदास यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजा व आरती पार पडली.वारीचा समारोप संत नामदेव महाराज यांच्या अमर अभंगाने झाला—“देह जावो अथवा राहोपांडुरंगीं दृढ भावो”समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थितीसमारोप प्रसंगी संत नामदेव महाराज यांचे वंशजमुकुंद महाराज नामदासमुरारी महाराज नामदासतसेच पालखी सोहळा पत्रकार संघाचेअध्यक्ष शंकर टेमघरेउपाध्यक्ष सुभाष भांबुरेसचिव ॲड. विलास काटेसहसचिव राजेंद्रकृष्ण कापसेखजिनदार मनोज मांढरे,विश्वस्त राजेंद्र मारणेराज्य समन्वयक (महाराष्ट्र) गणेश उंडाळेहे मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!