उद्या सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सोमंथळी येथे उत्साहात साजरा होणार!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:०१/०४/२०२६: प्रभाकर करचे : सोमंथळी गावातील श्री हनुमान मंदिरात यंदाचा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:०९ वाजता हनुमान जन्मोत्सवाचा पवित्र मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात येत असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकड आरती, त्यानंतर अभिषेक, पूजा-अर्चा व भजन-कीर्तन यांचे आयोजन करण्यात येणार आहे. भक्तगण “जय जय हनुमान”च्या जयघोषात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे चित्र आहे.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय भगवानराव सोडमिसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली असून, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!