प्रा.रमेश आढाव यांनी बजावला मतदानाचा हक्क

फलटण कोरेगाव मतदार संघातील संविधान समर्थ समिती पुरस्कृत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी ग्रामस्थ समवेत गुणवरे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी. याकरिता संविधान समर्थ समितीकडून मोठी चळवळ उभारण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रा.रमेश आढाव निवडणूक लढवीत आहेत.ही निवडणूक सर्वसामान्यांच्या घटनात्मक हक्काची आणि विकासाची आपल्याला करायची होती; असे सांगून मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन प्रा. रमेश आढाव यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!