राजकारण मीडिया:फलटण दि. २७/०६/२०२६: प्रभाकर करचे : अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत फलटण ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुणवरे (ता. फलटण) येथे छापा टाकून अवैध गांजा लागवडीवर धडक कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ₹३६,४५० किंमतीची ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मौजे गुणवरे येथील घुलेवस्ती परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) याने अवैधरित्या गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ
पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे
पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती
पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे
पोलीस नाईक रणपिसे
पोलीस कॉन्स्टेबल सागर अभंग
पोलीस कॉन्स्टेबल तुषार नलवडे
पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख
पोलीस कॉन्स्टेबल अविनाश शिंदे
या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या लागवडीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
