राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०४/०६/२०२६: प्रभाकर करचे| पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त विडणी येथे रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूभक्ती, नामस्मरण आणि अध्यात्मिक साधनेचा संगम असलेला हा सोहळा भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी येथे होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांचे आगमन, अभिषेक, आरती, श्री शंकरगीता पारायण, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून जिल्ह्यासह विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्रींच्या पादुकांच्या आगमनाने होणार असून सकाळी ११ वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता भव्य श्री शंकरगीता पारायण, सायंकाळी ५.३० वाजता महाआरती आणि सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद होणार आहे.
पारायणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्वनोंदणी करावी तसेच श्री शंकरगीता ग्रंथ सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सोहळ्याचे आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
चौकट
भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा
📅 दिनांक : रविवार, ७ जून २०२६
📍स्थळ : सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी, ता. फलटण, जि. सातारा
वेळापत्रक :
• सकाळी १०.०० वा. – श्रींच्या पादुकांचे आगमन
• सकाळी ११.०० वा. – पादुकांना अभिषेक
• दुपारी १२.०० वा. – आरती
• दुपारी १.०० वा. – भव्य श्री शंकरगीता पारायण
• सायं. ५.३० वा. – महाआरती
• सायं. ६.०० वा. – महाप्रसाद
संपर्क :मिलिंद कदम – ९५५२७११७७७निखिल (बाबूदादा) वाघमारे – ८३०८४०५०१७
