विश्वास, पारदर्शकता आणि विकासाचा चेहरा – स्वराज पतसंस्थेचे चेअरमन महादेव अलगुडे यांचा वाढदिवस उत्साहात!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: ०६/०२/२०२६ : प्रभाकर करचे:स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेव अलगुडे यांचा वाढदिवस आज विविध स्तरांतून शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे.

सहकार क्षेत्रात पारदर्शकता, शिस्तबद्ध कारभार आणि सभासदकेंद्री धोरण यासाठी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

अल्पावधीतच स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम, विश्वासार्ह आणि प्रगत वाटचालीवर नेण्यात महादेव अलगुडे यांचा मोलाचा वाटा आहे. सभासदांचा विश्वास, कर्मचारी बांधिलकी आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुरेख मेळ घालून त्यांनी सहकाराला नवी दिशा दिली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत सहकारातून विकास साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वाढदिवसानिमित्त सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी, हितचिंतक व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सहकार क्षेत्रात अशीच यशस्वी वाटचाल घडत राहो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

सहकारातून समृद्धीचा मार्ग दाखवणारे नेतृत्व – महादेव अलगुडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!