
फलटण:मुंजवडी तालुका फलटण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट श्रावणा रणदिवे यांचे जेष्ठ सुपुत्र उद्योजक मधुकरराव रणदिवे यांची बरड जिल्हा परिषद गटा मधून उमेदवारीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
उद्योजक मधुकरराव रणदिवे हे शरदचंद्र पवार साहेबांच्या वरती प्रेम करणारे नेतृत्व आहे.शांत सयमी व्यक्तिमत्व असून बरड गटात त्याचा दांडगा जनसंपर्क आहे.गेली कित्येक वर्षे सामाजिक व आर्थिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.कोरोना काळात जेष्ठ पासून तरूणा पर्यंत मदत केली आहे .
माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री सातारा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, युवा नेते मा.धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार आहेत.
तसेच त्यांना घरातूनच राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला असल्याने तरुण पिढीला बरोबर जाणारे एक नेतृत्व बरड जिल्हा परिषद गटातून उभे राहत असल्यामुळे जेष्ठ पासून तरुणात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे बरड गटातून उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.
