राजे गटाच्या चांडाळ चौकडीचा कायमचा खातमा!नगरपालिकेचा पराभव नाही, तर जिल्हा परिषद–विधानसभा–लोकसभेचा ट्रेलर!समशेरसिंह नाईक निंबाळकरांचा विजय; भाजप–अजित पवार राष्ट्रवादी गटाचा सत्तेवर थेट दावा!

मीडिया:फलटण (प्रतिनिधी):२१/१२/२०२५:फलटण नगरपालिकेत झालेला सत्तांतराचा निकाल म्हणजे राजकीय भूकंप नाही, तर राजे गटाच्या ३५ वर्षांच्या माजावर पडलेली अणुबॉम्बची ठिणगी आहे. वर्षानुवर्षे सत्ता, दबदबा आणि दहशतीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या राजे गटाच्या ‘चांडाळ चौकडी’ला जनतेने थेट रस्त्यावर आणून फेकले आहे.हाय-व्होल्टेज, प्रतिष्ठेच्या आणि जिवंतपणाच्या लढतीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधक अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना धूळ चारत नगराध्यक्षपदावर कब्जा केला. हा विजय केवळ एक पद नाही, तर राजे गटाच्या राजकीय शवपेटीवर ठोकलेला निर्णायक खिळा असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.या विजयामागे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची थंड डोक्याची पण धारदार रणनीती केंद्रस्थानी राहिली. नगरपालिकेपासून सुरू झालेली ही लढाई त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि थेट लोकसभेपर्यंत नेण्याची स्क्रिप्ट लिहिली आहे, असे राजकीय जाणकार उघडपणे बोलू लागले आहेत.फलटण नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी मिळवलेले स्पष्ट बहुमत म्हणजे येणाऱ्या सर्व निवडणुकांचा ट्रेलर आहे. आज नगरपालिकेत१८*९ पराभव, उद्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत धुव्वा, तर परवा विधानसभा आणि लोकसभेत राजे गटाच्या अस्ताचा शंखनाद, असेच चित्र सध्या स्पष्ट होत आहे.नगरपालिकेतील पराभवामुळे राजे गटाचे नेतृत्व, कार्यकर्ते आणि समर्थक पुरते हादरले असून आतून फुटीला सुरुवात झाल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. दुसरीकडे, भाजप–अजित पवार गटाचे मनोबल इतके उंचावले आहे की, फलटण तालुका आता त्यांच्या राजकीय ताब्यात गेल्याचे संकेत मिळू लागले आहेत.फलटणचा हा कौल म्हणजे ‘सत्ता कुणाचीही कायम नसते’ हा राजे गटाला दिलेला जनतेचा अंतिम निकाल आहे. आज नगरपालिका गेली…उद्या जिल्हा परिषद–पंचायत समिती…आणि लोकसभा…राजे गटासाठी आता प्रश्न विजयाचा नाही, तर राजकीय अस्तित्व टिकवण्याचा उरला आहे!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!