
फलटण -: दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभाग क्र. 2 मधील इच्छुक व प्रबळ धावेदार पांडुरंग समुद्राला अहिवळे व त्यांच्या कन्या कु.ऋतिका पांडुरंग अहिवळे यांच्याशी श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी पांडुरंग अहिवळे यांच्या निवासस्थानी चर्चा केली व आपला प्रभाग क्र. 2 मध्ये फलटण नगरपरिषद शिवसेना धनुष्यबाणाला जाहीर पाठिंबा असल्याचे पांडुरंग अहिवळे यांनी जाहीर केले.
फलटण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 2 मधील राजे गटाचे प्रबळ दावेदार श्री पांडुरंग समुद्राला अहिवळे यांनी राजे गटाला ताकद देण्यासाठी व उमेदवारी नाकारली तर कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत बंडाळी माजेल याचे विरोधकांना आयते कोलीत मिळेल व शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे उमेदवारांना निवडून येण्यासाठी मताधिक्य घटेल याची जाणीव ठेवून शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे उमेदवार ऍड.अनिकेत राहुल अहिवळे व सौ.आरती जय रणदिवे (काकडे ) हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून यावेत म्हणून स्वतःची व आपल्या मुलीची उमेदवारी अर्ज माघारी घेतला व राजे गटाला तथापि शिवसेना धनुष्यबाणाला जाहीर पाठिंबा देऊन राजे गटाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना धनुष्यबाणाचा विजय निश्चित असल्याचे श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.
