
फलटण:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या
निमित्त लाखो भावीक आळंदीत दाखलराजकारणसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज आळंदीत लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.
सकाळपासूनच आळंदी शहरात हरिनामाच्या गजराने मंगल वातावरण निर्माण झाले आहे.भाविकांसाठी प्रशासनाने विशेष वाहतूक व्यवस्था, आरोग्य शिबिरे आणि सुरक्षा बंदोबस्त उभारला आहे. समाधी मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लांबल्या असून, वारकरी परंपरेनुसार पालखी सोहळा, कीर्तन–भजन, महाप्रसाद यांचेही आयोजन करण्यात आले आहे.आळंदी संपूर्णपणे भक्तिमय वातावरणाने उजळून निघाली असून, “ज्ञानोबा माऊली, तुकाराम” या घोषणांनी शहर दुमदुमून गेले आहे.
