
फलटण: डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्तेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आर्यन लेडी बहन कु..मायावतीजी यांनी राष्ट्रीय जनांदोलनाचा इशारा केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मांगो इस्तिफा दो याच दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य प्रभारी संसद खासदार अशोक सिद्धार्थ साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड मा.सुनिल डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी समर्थक एकनिष्ठ स्वाभिमानी फलटण तालुक्यातील टिम सातारा जिल्हा माजी अध्यक्ष मा.मंगेश मोरे साहेब तसेच सातारा जिल्हा प्रभारी जेष्ठ नेञुत्व मा.उदय काकडे साहेब तसेच फलटण विधानसभेत प्रामाणिक एकनिष्ठ सर्वसामान्य संविधानिक मार्गाने चालणारे युवा नेञुत्व विधानसभा अध्यक्ष मा.प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे , बसपा एकनिष्ठ संघर्षमय टिम मा.दिनेश कांबळे ,उपाध्यक्ष मा.प्रविण विटकर ,फलटण विधानसभा प्रभारी तसेच ओबीसी नेञुत्व मा.सुहास काकडे ,विधानसभा महासचिव संदिप सोनवणे , जिल्हा महासचिव ओबीसी नेञुत्व मा.प्रकाश गिरी साहेब यांच्या समवेत अनेक बसपा समर्थक संविधान प्रेमी यांनी फलटण तालुका प्रांताधिकारी यांना समक्ष भेटून चर्चा करुन निवेदन देवून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा जर यांना संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य नसतील तर त्यांनीच दिलेल्या संविधान वरती आज ज्या पदावरून आपण संसदेत जातात तर हे पद सोडून द्या आणि जिथून स्वर्गात जाण्याची तिकिट पास भेटेल तेथून या देशाच्या बाहेर जावे यांचे समर्थन करणाऱ्या सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा संविधान हा या देशाची ओळख श्वास आहे तेच या मनु विचारी लोकांना गॅस वर जगण्याची सवय बनली लोकांच्या विरोधात आम्ही सदैव निषेधार्थ च राहणार परभणी हत्याकांडाला सामील व पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाला देशद्रोही जाहिर करावे .असे बसपा फलटण विधानसभा निवेदन देवून जाहिर निषेध व्यक्त केला.
