राजकारण मीडिया:फलटण:दिनांक:07/08/2026: प्रभाकर करचे:जय हनुमान दिंडी, सोमंथळी चे संचालक श्री. मधुकर लालासाहेब वाबळे यांच्या मातोश्री श्रीमंती यमुनाबाई लालासाहेब वाबळे यांचे शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सोमंथळी ,सांगवी परिसरासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. यमुनाबाई वाबळे यांनी आपल्या कुटुंबाला संस्कार, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि अध्यात्माची शिकवण दिली. त्यांच्या प्रेमळ, शांत आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने वाबळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चरणी चिरशांती लाभो, तसेच वाबळे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अंत्यविधी:शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 11.०० वाजता, सांगवी येथील निरा नदीकाठी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली!
राजकारण मीडिया परिवार 🙏
