विचारांचा दीप कायम तेवत ठेवणाऱ्या प्रा. रमेश आढाव यांना १८ जुलै रोजी अभिवादन

प्रथम स्मृतिदिनानिमित्त फलटणमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरण सोहळा

राजकारण मीडिया:फलटण: दिनांक:१५/०७/२०२६ : प्रभाकर करचे : अभ्यासपूर्ण लेखन, निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक नेतृत्व यांचा दुर्मीळ संगम असलेले ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यिक व विचारवंत दिवंगत प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी फलटण येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे हा कार्यक्रम होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात प्रा. आढाव यांनी आपल्या अभ्यासू विचारांनी, प्रभावी लेखनाने आणि समाजहिताच्या भूमिकेने स्वतंत्र ओळख निर्माण केली. सत्यनिष्ठ पत्रकारिता, वैचारिक प्रगल्भता आणि सामाजिक जाणीव यांचा त्यांनी आयुष्यभर जपलेला वारसा आजही अनेक पत्रकार, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्मृतिदिनानिमित्त सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत संस्कार विधी पार पडणार असून, त्यानंतर ११.०० ते १२.०० या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रा. आढाव यांच्या जीवनप्रवास, कार्यकर्तृत्व, पत्रकारितेतील योगदान आणि समाजासाठीच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त करणार आहेत.

प्रा. रमेश आढाव यांच्या वैचारिक कार्याला अभिवादन करण्यासाठी नागरिक, पत्रकार, साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चौकट :

प्रा. रमेश आढाव : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

– ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक आणि साहित्यिक.

– सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण व निर्भीड भूमिका.

– अनेक पत्रकार आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक.

– वैचारिक लेखनातून समाजप्रबोधनाचे कार्य.

– सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!