राजकारण मीडिया — दिनांक : 17/11/2025 : ही माहिती उपलब्ध तथ्यांवर आधारित असून रोजगार व शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात येत आहे.
आजच्या रोजगार बाजारात सुशिक्षित बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. अनेक तरुण फक्त कॉलेजची डिग्री मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात, परंतु वास्तविक कामासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यात मात्र मागे पडतात. कंपन्यांना आता फक्त शिक्षण नव्हे, तर प्रत्यक्ष कामकाजाची क्षमता, तांत्रिक कौशल्ये, डिजिटल ज्ञान आणि समस्या सोडवण्याची कला अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे.
म्हणूनच आजच्या तरुणांनी पारंपारिक शिक्षणाबरोबरच नवी कौशल्ये शिकून स्वतःला सक्षम बनवणे ही काळाची गरज बनली आहे. कौशल्ये असतील तरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात आणि करिअर अधिक मजबूतपणे उभं राहतं.
