
बारामती:बारामती तालुक्यातील जनता पुन्हा एकदा आपली परंपरा आणि विश्वास कायम ठेवताना दिसत आहे.लोकसभेसाठी सुप्रिया सुळे आणि विधानसभेसाठी अजित दादा पवार हे बारामतीकरांच्या मनातील ठाम निर्णय ठरलेला आहे.
उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अजित पवार यांनी बारामती तालुक्यात 60 ते 90 हजार हून अधिक मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केलेला आहे.बारामती तालुका आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाण्याचा कौल दिला आहे महायुती अथवा महाविकास आघाडीच्या सत्तेतून सरकार स्थापन झाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच विराजमान होतील अशी बारामती करांची ठाम भावना आहे.
