
अंगणवाडीतील आहार वाटप करण्या-या बचत गटाचे थकीत देयके दिवाळी अगोदर द्याव्यीत.सविता निमडगे यांची प्रशासनाकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी… नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रावर महिला बचत गट दोन वेळा ताजा आहार वाटपाचे काम महिला बचत गटांकडुन असून त्यांचे देयके काही ठिकाणी वर्षांपासून तर काही बचत गटाचे आठ महिन्यांपासून थकीत असल्याने नांदेड जिल्ह्यातील आहार वाटप करण्या-या महिला बचत गटासमोर अनेक अडचणी निर्माण होत असल्याने महिलांना स्वावलंबी बनविण्याचा शासनाचा मुख्य उद्देश ठेकेदाराच्याच हितासाठी ठरत असल्याने जिल्ह्यातील महिला बचत गटांकडुन याविषयी रोष व्यक्त आहे.थकीत देयके दिवाळी च्या अगोदर मिळावी.यापुढील देयके महिनेवारी मिळावी.शासनाच्या नियमानुसार पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील अंगणवाडीमधील आहार वाटपाचे काम महिला बचत गटास द्याव्यीत, स्वस्त धान्याचा गहु तांदुळ जिल्हा ऐवजी तालुका स्तरावर द्यावा अशी मागणी वीरशैव शिवा समाज संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविता निमडगे पळसेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्यासह नुकताच महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांना लेखी निवेदनातून मागणी करण्यात आली.निवेदनावर देवकाबाई मुलगीर डोंगरगाव जिजाबाई बावणे डोरलीकर यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी मी नुकताच पदभार स्वीकारला असल्याने याविषयावरील मागण्यांबाबत प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
