फलटणचा रणसंग्राम : परिवर्तनाची लाट की परंपरागत सत्तेचा किल्ला? आज सकाळी 10 वाजता मतमोजणी!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: ०९/०२/२०२६: प्रभाकर करचे:सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण तालुक्यातील निवडणुकीसाठी दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी मतदान शांततेत पार पडले. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण यांचे भवितव्य ठरवणारी मतमोजणी आज सोमवार, दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सुरू होत आहे.या मतमोजणीकडे संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन सत्ता समीकरणे उलथवून टाकणार का?की माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर आणि मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे अनुभवी नेतृत्व परिवर्तनाची लाट थोपवण्यात यशस्वी ठरणार—याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.फलटणच्या राजकारणात आजचा दिवस सत्ताबदलाचा ठराविक संकेत देणारा ठरणार की परंपरागत राजकीय पकड कायम राहणार, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. प्रत्येक फेरीतील निकाल, आघाडी–पिछाडी, धक्कादायक उलथापालथी आणि अंतिम चित्र यासाठी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.👉 मतमोजणीचे जलद, अचूक आणि विश्लेषणात्मक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच “rajkaran media” यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.फलटणच्या राजकारणाचा थेट नाडीवर हात—rajkaran media!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!