राजकारण मीडिया :फलटण : दिनांक: ०६/०२/२०२६: प्रभाकर करचे:-साधेपणा, प्रामाणिकपणा आणि ठाम विचारसरणीची ओळख असलेले भाऊराव करचे पाटील यांचा आज वाढदिवस विविध स्तरातून शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे आणि कामातून आपली ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
समाजहित, ग्रामविकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व अशी भाऊराव करचे पाटील यांची ओळख आहे. कोणताही दिखावा न करता सातत्याने काम करत राहणे, हीच त्यांची खरी ताकद मानली जाते. त्यामुळेच मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी दिसून येते.
वाढदिवसानिमित्त सामाजिक, सहकारी व मित्रमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजासाठी असेच प्रेरणादायी कार्य घडत राहो,” अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.कामातून विश्वास जिंकणारे नेतृत्व – भाऊराव करचे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
