माननीय आमदार सचिन दादा पाटील यांची अंकुशराव सोडमिसे यांच्या घरी सदिच्छा भेट!

राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे:फलटण तालुक्याचे माननीय आमदार सचिन दादा पाटील यांनी सोमंथळी परिसरातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व अंकुशराव सोडमिसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान आपुलकीच्या वातावरणात तालुक्यातील सामाजिक, राजकीय व विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या सदिच्छा भेटीवेळी सांगवी पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय पाटील तसेच स्वराज पतसंस्थेचे चेअरमन महादेव अलगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, ग्रामीण विकास, शेतकरी व युवकांशी संबंधित प्रश्न तसेच आगामी काळातील विकासात्मक नियोजनावर यावेळी विचारविनिमय झाला.

आमदार सचिन दादा पाटील यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अंकुशराव सोडमिसे यांनी आमदार सचिन दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

ही भेट केवळ सदिच्छा भेट न राहता, सोमंथळी व परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या सकारात्मक चर्चेचे केंद्र ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी सोमंथळी गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!