ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांचा आज वाढदिवस!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:१०/०१/२०२६: प्रभाकर करचे:महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, फलटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच साप्ताहिक श्रीहरी सुभाषितचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष भांबुरे यांचा वाढदिवस आज विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व हितचिंतकांच्या शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे. 

         पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, लोकहिताचे प्रश्न आणि सत्याची निर्भीड मांडणी करत त्यांनी अनेक वर्षे पत्रकारितेचा वसा जपला आहे. पालखी सोहळ्यासारख्या अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचे वार्तांकन करताना त्यांनी पत्रकारितेला नवी दिशा दिली. त्यांच्या सामाजिक जाणिवेच्या आणि अनुभवसंपन्न लेखनशैलीचा अनेक पत्रकारांना मार्गदर्शक लाभ झाला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अखंड यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!