
फलटण शहरातील राजकीय वातावरण तापले?
फलटण: दिनांक 6 ऑक्टोबर: मंत्रालय मुंबई येथे आज झालेल्या आरक्षण सोडतीत फलटण नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे.
मंत्रालय मुंबई येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षण सोडत जाहीर होताच फलटण शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे
