
फलटण:प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण तालुका स्तरावर रस्सीखेच व लंगडी स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल सौ.सुनिता पोपट रणदिवे व उद्योजक श्री.मधुकरराव रणदिवे यांनी मुंजवडी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्र शाळा मुंजवडी येथील तालुका स्तरावर झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रथम क्रमांक मोठा गट मुली, व्दितीय क्रमांक लहान गट – मुली व लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक लहान गट मुले यांनी पटकावला.

यावेळी सरपंच सौ.बेबीताई घाडगे, माजी सरपंच सौ. स्वाती ताई कदम मॅडम, मुख्याध्यापिका सौ.चोरूमले मॅडम, पोलिस पाटलीन रणदिवे मॅडम व शिक्षकवृंद,विद्यार्थी, विद्यार्थिनी इतर मान्यवर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
