बापाने केला मुलाचा खून

सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे

बारामती:अभ्यास करत नाही, बाहेर सारखा खेळत असतोस, तू तुझ्या आईच्याच वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत बापाने मुलाला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना होळ (ता. बारामती) येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर, संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी (दि. १४) अडीच वाजेच्या सुमारास नऊ वर्षाचा पीयूषला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केला. हे सगळे होत असताना आई शालन गणेश भंडलकर यांनीसदरची घटना पाहूनदेखील आपला पती विजय भंडलकर यास प्रतिबंध केला नाही. त्याच्या सांगण्यानुसार पीयूष हा चक्कर येऊन पडला आहे, अशी खोटी माहिती दिली.तसेच यातील संतोष भंडलकर यानेदेखील निरा येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पीयूष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

पुरावा नष्ट करण्याचा उद्देशडॉक्टरांनी पीयूष हा मयत झाल्याचे सांगून त्याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन जाण्यास सांगितले. ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. त्याबाबतचा पुरावा राहता कामा नये यासाठी त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथे घेऊन न जाता गावी घरी घेऊन गेले.पीयूष विजय भंडलकर (९ वर्षे, रा. होळ, ता. बारामती) याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे पोस्टमॉर्टम न करता त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी केली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!