पक्षाचा अध्यक्ष मी आणि हे म्हणतात रामराजेंना आमदार मी केलं – अजित पवारांवर शरद पवारांची खोचक टीका

फलटण – फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण येथील गजानन चौक या ठिकाणी शरद पवारांची जाहीर सभा पार पडली.

या जाहीर सभेत साखरवाडी येथे अजित पवारांनी केलेल्या विधानांचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, श्रीमंत रामराजेंवर अजित पवारांनी टीका केली. ते म्हणाले की, रामराजेंना आमदार मी केलं किती गमतीशीर गोष्ट आहे ना? पक्षाचा अध्यक्ष मी तिकीट द्यायचा अधिकार मला रामराजेंना आमदार मी केलं, म्हणणाऱ्यांना पण आमदारकीचे तिकीट मी दिल. माझं नशीब चांगलं आहे नाहीतर उद्या म्हणतील पवार साहेबांना पण मीच आमदार केल!! असे म्हणताच सभेला जमणाऱ्यांनी मोठा हास्यकल्लोळ केला.

किती बोलावं कसं बोलावं योग्य नाही. रामराजे हे विधिमंडळातील सदस्य आहेत त्या पदाची प्रतिष्ठा ठेवावी लागते. या पदाची आपण प्रतिष्ठा ठेवली तर लोक आपल्याला त्याच भावनेने बघत असतात. पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली नाही तर लोक जाहीर बोलणार नाहीत पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा होईल.

श्रीमंत रामराजे आपल्या स्वकृत्वावर अपक्ष आमदार निवडून आले आहेत कोणाच्याही मदतीशिवाय हे सांगण्यासाठी सुद्धा शरद पवार विसरले नाहीत. विधान परिषदेचे सभापती कोणाला करायचं त्यावेळी एकच नाव पुढे आले ते म्हणजे रामराजे, कोणी हे सांगत बसू नये त्यांना मीही केलं ते केलं या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.श्रीमंत रामराजे यांनी कृष्णा खोरे चे पाणी संबंध खेड्यापाड्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी काम केलं. त्यांचं ह्या कामात लौकिक होता अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केले. कृष्णा खोरे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. कृष्णा खोरे ची प्रगती संबंध महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील बदल करणारे आहे. कृष्णा खोरे ची जबाबदारी श्रीमंत रामराजे यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण सातारा जिल्ह्यात व पुणे जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!