राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे:सोमंथळी (दिनांक १५ फेब्रुवारी २०२६): महाशिवरात्र उत्सवानिमित्त सोमंथळी येथे धार्मिक वातावरणात भव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता ह भ प नितीन महाराज काशीद यांच्या प्रभावी कीर्तनाने भक्तिरसाची मेजवानी रंगणार आहे. हा कार्यक्रम श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर सोमंथळी येथे पार पडणार असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाचे अन्नदाते म्हणून पोपट नाना करचे, संभाजी भिवा करचे आणि विलास नारायण करचे यांनी पुढाकार घेतला असून भक्तांना प्रसाद व धार्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि महाशिवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्र निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
