राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात

फलटण:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये शरदचंद्र पवार पक्ष सर्व जागेवर निवडणूक लढवणार आहे.

तसेच या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक लढत आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या अस्तित्वासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक भरीव विकासासाठी ही निवडणूक लढवत आहेसत्ताधारी पक्ष शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनाभाक करत आहे आणि कर्जमाफीचं खोट आश्वासन दाखवत असून आमचा पक्ष शेतकऱ्याचे उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणार आहे .

मी धर्मराज पाटील शिक्षण बीएससी ऍग्री असून गेल्या दहा ते पंधरा वर्षे शेती क्षेत्रात प्रचंड मोठ्या कामातून हजारो शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे यामध्ये ऊस,भाजीपाला पीक, फुल शेती , फळ शेती असेल यातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला फायदा झालेला आहे यातून जनसंपर्क वाढला आहे .

मला स्वतःला राजकीय वारसा आहे माझ्या आजोबा शामराव पाटील यांचा यशवंतराव चव्हाण साहेबा बरोबर स्नेह होता त्याचबरोबर अकलूजच्या शंकराव मोहिते पाटील परिवारचे सुद्धा संबंध होते मी कोळकी जिल्हा परिषद गट लढवण्यास इच्छुक असून पक्षाकडे तशी मागणी केली आहे जर पक्षाने संधी दिलीच तर मी कोळकी जिल्हा परिषद गट लढवल्याशिवाय राहणार नाही

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!