
फलटण:सरडे तालुका फलटण येथील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे फलटण तालुका माजी अध्यक्ष धर्मराज पाटील पक्षाने संधी दिल्यास कोळकी जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे.
धर्मराज पाटील यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास धर्मराज पाटील यांचे मूळ गाव सरडे हे आहे तसेच त्यांनी बी ए सी एग्रीकल्चर कराड येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता शेती क्षेत्रात काम करायचे असे त्यांनी ठरवले आणि गेली दहा ते पंधरा वर्ष शेती क्षेत्रात एक नवीन विविध प्रयोग करून नावलौकिक मिळवलेले आहे. महामोरिंगा फील्ड्स प्रायव्हेट नावाची कंपनी स्थापना करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांनी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने वाढवावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन शिबिराचे विविध ठिकाणी आयोजन करून मार्गदर्शन करत असतात.
त्याचबरोबर त्यांना राजकीय वारसा सुध्दा आहे. धर्मराज पाटील हे अंदरूड गावचे स्वर्गीय शामराव पाटील यांचे ते नातू आहेत.स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ते स्वर्गीय शामराव पाटील निकटवर्ती होते. स्वर्गीय शामराव पाटील यांनी स्वर्गीय चिमणराव कदम स्वर्गीय हनुमंतराव पवार यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेले होते. त्याचबरोबर अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाशी त्यांचे घरगुती संबंध होते.त्यामुळे त्यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळालेले आहेत.
फलटण तालुक्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे राजे गट व दुसरीकडे खासदार गट यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तालुका अध्यक्ष पदी नेमणूक केल्यानंतर दहा दिवसात पक्ष उभा करून निवडणूक रिंगणात उतरून लढवलेला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत संधी दिल्यास पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरून दोन बलाढ्य शक्तीच्या विरोधात निवडणूक लढवणार असे त्यांनी आवाहन केले आहे.
