३५ वर्षांनंतर सत्तांतराचा जल्लोष; आज सायंकाळी गजानन चौकात महायुतीच्या दिग्गजांच्या तोफा धडाडणार!

राजकारण मीडिया: दिनांक२५/१२/२०२५:फलटण विशेष प्रतिनिधी प्रभाकर करचे फलटण नगरपालिकेत तब्बल ३५ वर्षांनंतर ऐतिहासिक सत्तांतर घडवत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी नगरपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ठीक सहा वाजता गजानन चौक, फलटण येथे विजय्योत्सव सभा आयोजित करण्यात आली असून महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राजकीय तोफा धडाडणार आहेत.या ऐतिहासिक निकालात २७ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत महायुतीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. विरोधी राजे गटप्रणित शिवसेना (शिंदे गट) व कृष्णा–भीमा विकास आघाडीला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.विजयाचे शिल्पकार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी आणि आगामी विकास आराखड्यावर ते नेमके काय बोलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.या विजयसभेला माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. फलटणच्या राजकारणात नवे पर्व सुरू करणाऱ्या या विजयामुळे शहराच्या विकासाला वेग मिळणार, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

👉 वेळ: सायंकाळी ६ वाजता👉 ठिकाण: गजानन चौक, फलटण

फलटणच्या राजकीय इतिहासातील या निर्णायक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!