फलटणमध्ये ‘फकीरियत’ चित्रपटाचा भव्य शुभारंभ; माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांना ‘क्रियायोग भूषण’ सन्मान

राजकारण मीडिया: फलटण: प्रभाकर करचे:दिनांक 2 नोव्हेंबर 2025:माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या जीवनप्रेरित ‘फकीरियत’ या चित्रपटाचा भव्य उदघाटन समारंभ फलटणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. क्रियायोग मिशन फाउंडेशनच्या संस्थापिका असलेल्या माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या हस्ते या चित्रपटाचे उदघाटन झाले. यावेळी फलटण येथील साधकांच्या वतीने गुरुमाई यांना ‘क्रियायोग भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उदघाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमाला संत गुरुमाई यांचे फलटण तर्फे—डॉ. गुळवणी सर, डॉ. गुळवणी मॅडम, डॉ. माधव पोळ, डॉ. अलका पोळ, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. किरणकुमार नाळे, डॉ. राजश्री नाळे, ला. मंगेश दोशी, ला. पूजा दोशी, श्री. कैलास साळुंके, श्री. राकेश हेंद्रे, श्री. बाबाजी काळे, डॉ. सुजित अडसूळ (बारामती), ऍड. योगेश वाघ (बारामती) तसेच स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी गुरुमाई यांचा सत्कार केला.चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी; क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती१ डिसेंबर २०२५ रोजी सिटी प्राईड, फलटण येथे झालेल्या या विशेष स्क्रीनिंगला माँ गुरुमाई स्वतः उपस्थित राहिल्या. चित्रपटगृहाची क्षमता ३८० असूनही ४६० प्रेक्षक उपस्थित होते. वाढलेल्या गर्दीमुळे अतिरिक्त खुर्च्या लावून प्रेक्षकांना बसवण्यात आले. चित्रपट पाहिल्यानंतर सर्व साडेचारशे प्रेक्षकांना गुरुमाई यांनी दर्शन व कृपाशीर्वाद दिला. दीड तास मार्गदर्शन – अध्यात्म, क्रियायोग, ध्यानावर सखोल भाष्यकार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांनी सुमारे दीड तासांचे सखोल मार्गदर्शन केले.या वेळी त्यांनी खालील आध्यात्मिक विषयांवर विस्तृत विवेचन केले—अध्यात्म म्हणजे काय?क्रियायोगाचा खरा अर्थध्यानाची योग्य पद्धतपाखंड आणि खरे साधन यातला फरकतंत्र म्हणजे काय?क्रियायोग कसा करायचा आणि त्याचे फायदे विशेषतः तरुणांनी कमी वयातच आध्यात्मिक मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.गुरुमाईंच्या क्रियायोग प्रवासाची दहा वर्षे गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रभर आणि वाराणसीतील काशी प्रदेशात गुरुमाई क्रियायोगाच्या बॅचेस घेत आहेत.क्रियायोग ही प्राचीन योगिक साधना—ध्यान, प्राणायाम, मुद्रा, आणि प्राचीन अध्यात्मिक तत्त्वज्ञान यांचा संगम असल्याचे त्या सांगतात.त्यांचे उत्तराखंडातील द्वारहाट–कुकुचिना येथे गुफा आश्रम संकुल, तसेच रुद्रधाम, नाशिक येथे आध्यात्मिक केंद्रे आहेत.क्रियायोग मिशन फाउंडेशनचे ध्येयजगभरातील ध्यान आणि क्रियायोग शिकू इच्छिणाऱ्या साधकांसाठी आधुनिक आणि समकालीन आध्यात्मिक जागा निर्माण करणे हे फाउंडेशनचे ध्येय आहे. येथे खालील शिबिरे व प्रशिक्षण दिले जातात—बेसिक व अ‍ॅडव्हान्स क्रियायोग दीक्षाकर्मक्षालन यज्ञब्रह्मखोज शिबिरहिमालयीन साधनाही सर्व शिबिरे नाममात्र शुल्कात आयोजित केली जातात, जेणेकरून सर्वसामान्य साधकांनाही लाभ घेता येईल.-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!