जय हनुमान दिंडी सोमंथळी

देहू प्रतिनिधी:फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील जय हनुमान दिंडी आज भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाली. दिंडीने तुकाराम महाराजांच्या पवित्र मंदिरात दर्शन घेऊन कीर्तन, भजन आणि नामस्मरणाच्या गजरात वातावरण भारून टाकले.

दर्शनानंतर दिंडीतील सर्व श्रद्धाळू भक्त परतीच्या मार्गावर निघाले असून, संपूर्ण परिसरात हार्हार व विठ्ठल-तुकारामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.भक्तांच्या सुरक्षेकरिता स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक दक्ष असल्याचे सांगण्यात आले. मार्गात दिंडीचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी ग्रामस्थांनी पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.या दिंडीत सर्व वयोगटातील भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून, तुकाराम महाराजांच्या कृपेचा अनुभव घेत परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!