
फलटण नगर परिषदेच्या रणाधुमाळीला प्रारंभ (माजी नगराध्यक्षांच्या उमेदवारी साठी मतदार राजा आग्रही)
फलटण. फलटण येथे 9 ऑक्टोंबर रोजी प्रभाग रचनेनुसार आरक्षण जाहीर होताच प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निश्चित झाल्यावर तेथील मतदार राजा काही तासातच सौ नंदाताई संपतराव निंबाळकर माजी नगराध्यक्षांच्या निवासस्थानासमोर गर्दी करू लागला आणि नगरपरिषदेतील त्यांची विकासात्मक कारकीर्द पाहता आपणच पुन्हा या प्रभागामधून नगरसेवक होणे प्रभागाच्या अडीअडचणीसाठी गरजेचे आहे, असा आग्रह त्यांना करू लागले आहेत.
सौ. नंदाताई संपतराव निंबाळकर यांना पूर्वीपासूनच फलटण शहरामध्ये त्यांच्या सर्वसामान्यांच्या बद्दल असणाऱ्या आस्था आणि जिव्हाळ्यामुळे सर्वांना त्यांच्या माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी दाखवलेली प्रभागातील समस्या बाबतची तत्परता पाहता प्रभागातील मतदार राजा आणि फलटण शहरातील दिग्गज नेत्यांच्या वर असणारा त्यांचा प्रभाव पाहता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास या प्रभागामध्ये विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास येथील नागरिकांच्यात आढळून येत आहे. वयोमान परत्वे जर त्यांनी उमेदवारी नकार दिला तर त्यांच्या ज्येष्ठ सुनबाई सौ.प्रियांका अमोल निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी मतदार राजा आग्रही असल्याचेही दिसून येत आहे यावेळी माजी उपनगराध्यक्षा यांनी वयानुसार परत उत्तम कार्यकाल करता येईल का? असे मतदारांच्या आग्रही भूमिकेला उत्तर देताना विचारल्यावर मतदारांनी तुमचा संस्काराचा आणि सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातला वारसा चालवणाऱ्या तुमच्या ज्येष्ठ सुनबाई सौ. प्रियंका अमोल निंबाळकर या सुनबाई साठी अथवा द्वितीय सुनबाई सौ. शुभांगी अतुल निंबाळकर यांना तुम्ही उमेदवारी घ्यावी अशी ही आग्रही भूमिका त्यांना करण्यात येत आहे.
तसेच या प्रभागामध्ये या माजी उपनगराध्यक्षांचा जनसंपर्क सर्वच समाजाशी असणारा जिव्हाळा आणि वेळप्रसंगी खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची तडफ पाहता गावठाणात असणाऱ्या या प्रभागामध्ये बऱ्याचशा मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव दिसून येत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना आपल्या हक्काचा नगरसेवक फलटण नगर परिषद मध्ये असावा असे नागरिकांच्या प्रथम दर्शनी तरी दिसून येत आहे.
तसेच या प्रभागात सर्वांशी असणारी हितसंबंध आणि सामाजिक आणि धार्मिक कार्यात असणारा त्यांचा मोलाचा वाटा पाहता हे निंबाळकर कुटुंब त्याच प्रभागामध्ये असणारा त्यांचा नातेसंबंध विचारात घेतला तर त्यांचा विजय आज निश्चित मानण्यात येत आहे. वयोमानानुसार आपल्या असणाऱ्या उत्तम कार्यकालाचा अनुभव त्यांनी विचारात घेऊन त्यांनी प्रभागाच्या हितासाठी त्यांच्या सुनबाईंना संधी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका मात्र आता प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक घेताना दिसून येत आहेत.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात सतत कार्यरत असणारे हे कुटुंब आता उमेदवारी बाबत काय निर्णय घेत आहे याबाबत सर्वजण वाट पाहत आहेत. नागरिकांच्या आग्रहास्तव जर या कुटुंबाने नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली तर समाजाशी असणारा त्यांचा हितसंबंध पाहता विजय निश्चित आहे अशी खात्री या नागरिकांनी दिली आहे.
