स्वर्गीय के के प्रतिष्ठान मठाचीवाडी यांच्या कडून जिल्हा परिषद केंद्र शाळा तावरे नगर व आक्रमक गणेश उत्सव मंडळ यांना साऊंड सिस्टिम भेट….

फलटण प्रतिनिधी: सचिन खुडे

फलटण:मठाची वाडी तालुका फलटण येथे जिल्हा परिषद शाळा तावरे नगर व आक्रमक गणेश उत्सव मंडळ तावरे नगर यांना स्वर्गीय के के कदम प्रतिष्ठान मठाचीवाडी यांच्या कडून 45 हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टिम देणगी स्वरूपात भेट म्हणून देण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित स्वर्गीय के के प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भैया कदम यांच्या हस्ते साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा व कला गुणांना वाव देण्यासाठी साऊंड सिस्टीम भेट देण्यात येतं आहे,असे मत अध्यक्ष विजय भैया कदम यांनी मांडले आहे.

तसेच यावेळी माजी उपसरपंच संजय भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश शेलार, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन खुडे, प्रमोद खरात ,सोमनाथ निकाळजे, शंकर खरात, राहुल भोसले, दत्तात्रय काकडे, उत्तम गुळवे, संतोष भोसले, आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!