अहिल्यानगर येथे”द युवा ग्रामीण पत्रकार संघ” महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र(अहिल्यानगर):अहिल्यानगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात”द युवा ग्रामीण पत्रकार संघ” महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतुन ४० ते ५० पुरस्कर्ते यांना देण्यात आला यावेळी खासकरुन सातारा जिल्ह्यातील एकुण ९ तर फक्त फलटण तालुक्यातील ५ पुरस्कर्ते यांना देण्यात आला.या गुणगौरव सोहळ्यात हिसरे तालुका करमाळा जि.सोलापूर तर फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी चे तरुण तडफदार पॆलवान अमित करचे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केल्याबद्दल मा. राजेश रघुनाथ पवार व अमित करचे यांना राज्यस्तरीय “समाजभूषण पुरस्कार” 2025 दिला. या कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुरस्कार सन्मानपत्र सह मेडल देऊन सन्मानित केले. मा. राजेश पवार तसेच अमित करचे हे पत्रकार असून गेली अनेक वर्ष फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे बहुजन समाजासाठी काम करतात.

तसेच उत्क्रुष्ट अंगणवाडी मदतनीस म्हणुन आमच्या लोणंद च्या भगिनी सॊ छाया पांडुरंग कुंभार यांना राज्य पुरस्काराने सन्मान केले तर खास करुन सांगावे वाटते राजेश पवार सर यापूर्वी यांना ‘द बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र’ राज्य यांच्या वतीने “समाजरत्न पुरस्कार ” 2019 आणि दैनिक तुफान क्रांती यांच्या वतीने “आदर्श सन्मान पुरस्कार 2022” देऊन सन्मानित करण्यात आले होते. यांना या पुरस्कारामुळे हिसरे गावात पंचक्रोशीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहेहा पुरस्कार सोहळा मुख्य अग्निशामक अधिकारी श्री शंकर पिसाळ व पोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद गीते साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अन्सारभाई शेख सर, राज्य उपाध्यक्ष प्रा. जीवन मोहिते सर, प्रांत अधिकारी सुधीर पाटील बहुजन समाज पार्टीचे तसेच द युवा ग्रामीण पञकार संघ सातारा जिल्हा संपर्क प्रमुख मा. प्रदिप उर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे साहेब, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा आणि तालुका प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी मांडले तर आभार प्रदर्शन द युवा ग्रामीण पञकार संघाचे सातारा जिल्हा प्रभारी अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष प्रा. जीवन मोहिते सर यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!