आजच्या तरुणांनी भक्ती मार्गात सहभाग घ्यावा !डॉ. शशिकांत पोळ

फलटण (प्रतिनिधी) – सचिन खुडे

खंडाळा:जीवनात आध्यात्मिक सुख प्राप्तकरण्यासाठी तरुणांनी आध्यात्मिक विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आजच्या तरुणांनी भक्ती मार्गात सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. शशिकांत पोळ (पुणे) यांनी केले. खंडाळा येथील अहिरे या ठिकाणी गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी संत निरंकारी मिशनचे जेष्ठ प्रचारक डॉ. शशिकांत पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सायं. 6 ते 9 यावेळेत विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होत्या.

या विशेष सत्संग सोहळ्यास सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, यांच्यासह आजूबाजूच्या शाखांचे मुखी, सेवादल अधिकारी, तसेच खंडळा परिसरासह शिरवळ, लोणंद आदी परिसरातून मोठा जलसमुदाय उपस्थित होता.

उपस्थित जनसमुदायाला संबोधन करताना डॉ. शशिकांत पोळ म्हणाले जगात देव एक आहे आणि त्याला पाहून भक्ती करण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत त्या परमपिता परमात्माला पहिल्याशिवाय भक्तीला सुरुवात होणार नाही. असे ही यावेळी सांगितले.

डॉ. पुढे म्हणाले संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ब्रम्हज्ञानाच्या माध्यमातून त्या परमात्माची प्राप्ती करून देतात. ब्रह्मज्ञानावर विश्वास ठेवून जो पूर्णपणे समर्पित होतो तोच भक्त पदाला पोहोचतो. करण भक्तामध्ये श्रद्धा विश्वास असल्याशिवाय भक्ती निर्माण होणार नाही असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले.

हा सत्संग सोहळा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सेवादल सेवादल भगिनी खंडाळा सेक्टर संयोजक सतीश गावडे माऊली भोसले मोरे महाराज यांनी विशेष परिश्रम घेतले तर मनसंचलन. दिनकर पाटील मुंबई यांनी केले. आभार सुनील धायगुडे यांनी मानले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!