अरुण शेलार तहसिलदार दौंड यांच्या आदेशाला चार महा-ई- सेवा मालक/ चालकांनी दाखवली केराची टोपली

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे

दौंड:महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आधार कार्ड दुरूस्ती व निवडणुक ओळख पत्र नोंदनी व अपटेड हया संदर्भात सन्माननीय अरुण शेलार तहसिलदार साहेब यांना विनंती अर्ज दिनांक ०४\०४\२०२५ रोजी दाखल केला होता.

सन्माननीय तहसिलदार साहेब अरूण शेलार यांनी दिनांक ०९\०४\२०२५ रोजी आदेश काढून १] श्री निलेश आवचर रा.देवळ गांव राजे २]श्री.योगेश रांधववण रा.कुरकुंभ ३] श्री.केतन सोरटे रा.गोपाळ वाडी ४]श्री.किरण काकडे रा.वरवंड यांना आदेश काढून संपूर्ण संचासहित ऑपरेटर घेऊन पंचायत समिती सभागृहात उपस्थित राहून सकाळी ०९ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत राहण्याचे आदेश दिले होते.

मात्र एक जन सुद्धा त्या दिवशी जवळ पास बारा वाजे पर्यंत उपस्थित न राहिल्या मुळे मी स्वता पॅथर जयदीप बगाडे दौंड अध्यक्ष न्यू महाराष्ट्र पॅथर सेना यांनी सन्माननीय दौंड तहसिलदार यांना मोबाईल फोन द्वारे फोन करून विचारले असता त्यानी फोन वर मला मी बाहेर आहे आपन RNT मॅडम यांना फोन करा आसे सांगितले माझ्या कडे नबंर नसल्या मूळे मी सन्माननीय साहेब यांना नबंर पाठवण्यास विनंती केली. आणि साहेब यांनी विनंती मान्य करून मला RNT मॅडम चा नबंर पाठवला.

मी स्वता सन्माननीय RNT मॅडम देशमुख मॅडम शी संपर्क साधू सांगितले मॅडम लोक ( जनता) येत आहे आणि विचारत आहे. तुम्ही फोन करून सांगा आणि जनते च्या सोयीसाठी नियमाने काम करण्या साठी एक जन तरी पाठवा मी फोन केले आहे पण ते ऊडवा उडवीचे उतरे देत आहे. तरी देखील सायंकाळी ०६ वाजेपर्यंत एकजन सुद्धा उपस्थित झाला नाही. हयाची मात्र खंत वाटते आहे. महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मुळे मुदाम हे लोक आले नाही आसे माझे म्हणने आहे. तसेच जर एका तहसिलदार व विशेष दंडाधिकारी यांन च्या आदेशाला हे केराची टोपली दाखवत आसतील तर माझी सन्माननीय तहसिलदार अरुण शेलार साहेब दौंड व RNT मॅडम देशमुख मॅडम यांना विनंती आहे आपण तातडीने आदेश काढून यांनचे महा- ई_ सेवा केन्द्र बंद करून यांच्या मशीन ताब्यात घावे. तसेच जानून बुजून फक्त डाॅ महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आहे.म्हणून त्यानी टाळाटाळ केली आहे. आसे माझे म्हणने आहे तसे त्याच्या वर फौजदारी अनुसुचित जाती व जमाती कादयाने गुन्हा दाखल करावा. व सन्माननीय तहसिलदार साहेब अरूण शेलार यांन च्या आदेशाचा भंग केला म्हणून शिस्त भंगाची कारवाई करून त्याचे महा _ई_ सेवा केन्द्र तातडीने बंद करून सिल करण्यात यावे आपण येणारे दहा दिवसांत काही कारवाई केली नाही तर मी व संपूर्ण आंबेडकर अनुयायी दौंड तहसिलदार कार्यालय दौंड समोर मोठे आदोलन व अमरण उपोषणाला बसणार आहे.

हे सर्व संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन उभे राहिले आणि काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी दौंड तहसिल कार्यालय जबाबदार राहिल हे खुले पत्र लोक शाहीला गृत धरून साधर करत आहे. तसेच उदया आपल्या कार्यालयास रजिस्टर पोस्टाने व २००० ITअॅट नुसार ईमेल द्वारे पाठवणार आहे. हयाची दखल घ्यावी.जर दौंड तहसिलदार साहेब अरूण शेलार यांनचा आदेश मानत नसतील तर ते भारतातील कायदा मानत नाही. हे देखील मान्य करून इतर कलमा नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.आणि आज पासून यांन च्या आयडी वरून आधार कार्ड व दुरूस्ती करण्यात आली तर संपूर्ण जबाबदारी ही दौंड तहसिलदार कार्यालयाची राहिल यांची नोंद घ्यावी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!