
फलटण:आज दिनांक ४/४/२०२५ रोजी वार शुक्रवार फलटण बार असोसिएशनची निवडणूक पार पडली आहे. सदर निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अँड नितीन जाधव तर उपाध्यक्षपदी अँड सागर देशपांडे,सचिव पदी अँड निलेश भोसले यांचा अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी या तिघांनी विजयी मिळवला आहे.
तसेच या निवडणुकीत खजिनदार पदी अँड स्वरदा जाधव,सह सचिव अँड अभिषेक राऊत सदस्य पदी १) अँड निशा कदम २) अँड निकीता रसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडणुकीत एकूण मतदान ३४८ पैकी ३०९ मतदान झाले आहे.या निवडणुकीत विजयी उमेदवार अध्यक्ष पदासाठी अँड नितीन जाधव यांना २०० मते मिळाली तर उपाध्यक्षपदासाठी अँड सागर देशपांडे यांना २०४ मते मिळाली.तसेच सचिव पदासाठी अँड निलेश भोसले यांना सर्वाधिक २४० मते मिळाली आहेत.
वरील तीन पदांसाठी निवडणूक पार पडली उरलेली सहसचिव, खजिनदार,दोन सदस्य या जागी बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांचे वकील संघातर्फे अभिनंदन करण्यात आलेले आहे.